१९८१
मध्ये, ‘मी नेचर लव्हर्स’ ह्या संस्थे बरोबर पदभ्रमणास सुरवात केली. पुढे
१९८६ मध्ये ‘रतन
गड’ परिसरातील
‘बाण’ सुळक्यावर यशस्वी चढाई केली. १९८७ साली माहुली परिसरातील ‘करवली’ व ‘नवरा’
हे सुळके सर केले. नंतर रायगडा समोरील ‘लिंगाणा’ व ‘भवानी कडा’ सर केला. त्याच
वर्षी ‘कुल्लती व्हॅली’, मनाली परिसरातील ‘ज्योरी’ शिखर सर केले. येथे ‘नेचर
लव्हर्स संस्थे तर्फे मी छायाचित्रकार होतो. १९८८ला ‘पिनॅकल’ संस्थे तर्फे
छायाचित्रकार म्हणून काम करताना, मनाली परिसरातील ‘नोर्बु’ व ‘धौलधार डोंगर
रांगेतील’, ‘माँन’ शिखर सर केले. १९८९ मध्ये हिमाचल प्रदेश जवळील काझा परिसरातील
‘कानामो’ शिखर सर केले. नंतर उत्तर प्रदेशातील, ‘कामेट’ व ‘अभीगामेन’ तसेच
‘म्हात्री’ व गढवाल मधील ‘पनवली द्वार’ ह्या शिखराच्या मोहिमेत छायाचित्रकार
म्हणून सहभाग घेतला. ‘ट्रान्स हिमाचल’ ट्रेक केला. तसेच उत्तरा खंड, उत्तर प्रदेश,
सिमला, सिक्कीम, मनाली येथे नऊ हिमालयीन पदभ्रमण मोहिमेत छायाचित्रण केले.
राजस्थान वाळवंटात दोन पदभ्रमण कार्यक्रम केले. ओरिसा, मिझोराम, मेघालय येथे युथ हॉस्टेल
बरोबर पदभ्रमण केले. २००२ला बाळ राऊळ सहित तपोवन, शिवलिंग पायथ्या पर्यंत हिवाळी
पदभ्रमण केले. ओरिसा येथे सागरी पदभ्रमण व महाराष्ट्रात आत्ता पर्यन्त बरेच पदभ्रमण
केले. भैरव गडाची भिंत, मुंब्रा, मच्छिंद्र गड येथील प्रस्तर भिंत चढाई देखील
केली. किल्लारी येथे १९९३ला आज दिनाक तर्फे जाऊन सहकार्य केले. तेथे नऊ दिवस होतो.
कामशेत येथे ‘पॅराग्लायडींग’ प्रशिक्षण घेतले. १९८७ पासून हिमालय,
राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर
प्रदेश, आसाम व महाराष्ट्र येथे, ‘वाईल्ड लाईफ फोटोग्राफी’ करीत आहे.
चेंबूर
व कूर्ला येथील अभिरुची व विहंग या संस्था मध्ये कार्यरत असून सामाजिक उपक्रम तसेच
एकाकिंका स्पर्धेत सहभाग आहे. १९८७ला डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या सहकार्याने चेतन
दातार लिखीत व दिग्दर्शित ‘गर्द की गुलामी’
ह्या गर्द विरोधी पथनाट्यात मी कलाकार म्हणून भाग घेतला होता. या पथनाट्याचे महाराष्ट्रात १४०
प्रयोग झाले. किंग जॉर्ज
दादर येथील शाळेत मराठी साहित्य संमेलन होते. तेथे चार ते पाच प्रयोग आम्ही केले.
लायन्स क्लब, रोटरी क्लब अशा बऱ्याच सामाजिक संस्थांनी प्रयोग ठेवले होते.
त्यावेळी डॉ. श्रीराम लागू व सुनील दत्त यांच्या तर्फे सर्व कलाकारांचा सत्कार
करण्यात आला होता.
११
वर्ष व्याख्यान मालेचे आयोजन करताना, त्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक
लेखकांचे व्याख्यान व कवी संमेलनाचे आयोजन केले. १९८९ ला सह्याद्री वाहिनीवर, ‘एक
आकाश संपले’, ह्या मालिकेत अभिनय केला.
२०१६
ला ‘मलय अँडव्हेंचर’ तर्फे मनाली जवळ ‘क्षितीधर’ व ‘हनुमान तिब्बा’ ह्या मोहिमेत
छायाचित्रकार म्हणून सहभाग नोंदवला.
२०२२ला
कोकणकडा मोहिमेत छायाचित्रकार म्हणून सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment