Friday, June 4, 2021

Datta Phope

 दत्ताराम तुकाराम फोपे

दत्ता फोपे यांना बालपणापासून गिर्यारोहण व निसर्गाची आवड होती. झाडांवर मचाण बांधून पशु-पक्षी, झाडे व फुले, यांच्यात रमायला, अभ्यास करायला त्यांना आवडायचे.

१९७९ साला पासुन आजतगायत  जवळ जवळ ४२ वर्षे ते गिर्यारोहणात कार्यरत आहेत. त्यांनी रात्रीचेही अनेक ट्रेक केले आहेत. जेव्हढे वय तितके जवळ जवळ ६२ भिमाशंकरचे ट्रेक त्यांचे झाले आहेत, त्यांनी जेव्हढे वय तेव्हढ्या भिमाशंकरच्या खेपा असा त्यांचा संकल्प आहे आणि अजूनतरी तो चालू ठेवलाय.

केव्ह एक्सप्लोरर्स, महाबँक ट्रेकर्स, नेचर लव्हर्स, ऋणानुबंध या संस्थाच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा आहे. याच केव्ह एक्स्प्लोरर्स संस्थेतर्फे महाराष्ट्रातील पहिली भूयारी मोहिम आंबोली येथे केली. येथील हिरण्यकेशी नदिच्या उगमाचा शोध त्यांनी घेतला. भूयार संशोधन मोहिमांमागे त्यांचा इतिहास संशोधन आणि अंधश्रद्धा निमूर्लनाचाही हेतू होता  त्यानंतर त्यांनी रेवदंडा येथील भूईकोट किल्ल्या खालील भूयाराचा शोध, शिवथरघळ, माणिक गड, घोडप गड, मांगी तूंगी, रत्नदुर्ग, भगवती बंदर येथील भूयारांचाही शोध घेतला. युथ होस्टेल असोशिएशन ऑफ इंडियाच्या वतीने मेघालयात  भूयार मोहिमेची सुरूवात केली.

नेहरू इस्टीट्यूट ऑफ मॉउंटेनियरिगचे एक महिन्याचे प्रशिक्षण त्यांनी "अ" वर्गात पूर्ण केल्यावर त्यांच्या रॉक क्लायबिंग व हिमालयीन मोहिमांना खऱ्या अर्थाने सुरूवात झाली.

भागिरथी II शिखर (२३००० फूट), हिमालयीन इतिहासात नोंद झालेले कुमाऊ रिजन मधील २१००० फूट उंचीचे अजिंक्य सूलीटॉप ही शिखरे त्यांनी सर केली. याचबरोबर २००९ ते २०२० पर्यंत दर वर्षी युथ हॉस्टेल तर्फे  सौरकुंडी पास, चद्रखणी पास, सारपास, हमता पास आदी हिमालयीन पदभ्रमण मोहिमा त्यांनी केल्या.हमता सर्क्युल्लर, बेदणी बुग्याल, राजस्थान डेझर्ट ट्रेक, मेळघाट ट्रेकही त्यांनी केले.

प्रस्तरारोहणातील कामगिरी बद्दल बोलायचे झाले तर सर्वात प्रथम आधुनिक तंत्राद्वारे नागफणी उर्फ ड्यूक्स नोज सुळका सर करण्यात ते यशस्वी झाले. त्याचबरोबर हरिश्चंद्र गडावरील काळकाईची शेंडी, हडबिची शेंडी, तांदूळवाडी येथील सुळका, नवरा नवरी, वानरलिंगी, लिंगाणा, भिमाशंकर क्षेत्रातील पदरगड च्यशेजारचा कलावंतीणीचा सुळका, मांगी तुंगी, कर्नाळा सुळका, भवानी कडा इत्यादी अनेक सुळके त्यांनी सर केले.

कोकण कडा येथील प्रस्तरोत्तालनासह, नागफणी, तैल बैला, येथेही यशस्वी प्रस्तरोत्तालन(रॅपलिंग) केले आणि शिबिरांचे आयोजन केले.,

ते हॉलीडे हायर्क्स, युथ होस्टेल, साद, हिमालय क्लब, गिरीविहार, निसर्ग मित्र या संस्थांचे सदस्य आहेत,तर केव्ह एक्सप्लोरर्स, महाबँक ट्रेकर्स,नेचर लव्हर्स या संस्थांचे संस्थापक आहेत.

हिमालय आणि सह्याद्री मध्ये शैक्षणिक मदत, आरोग्य शिबीराचे आयोजन, पूर-वादळग्रस्थ भागात जागेवर जाऊन मदत, माणुसकीची भिंत,असे बरेच सामाजिक कार्य त्यांनी आपल्या संस्थाच्या वतीने केले आहे. यामध्ये लोहगडच्या पायथ्याशी असलेल्या संपर्क बालक ग्रामातील अनाथ मुलांसाठी अनोखा उपक्रम, मुंबईतील गिर्यारोहक मुलांसह, कलादालन-संस्कृतिक उपक्रम, एकत्र राहून प्रेमाचे आदान प्रदान, शैक्षणिक, क्रिडा साहित्य देवून कर्तव्य भावनेने मदत, कळसुबाईच्या पायथ्याशी बारी गावात कापड, अन्न धान्य, औषध वाटपासह शैक्षणिक मदत, सिंधुताई सकपाळ यांना भरघोस सहाय्य महाबँक ट्रेकर्स च्या माध्यमातून त्यांनी केले आहे. ऋणानुबंध, दुर्गभरारी, महाबँक ट्रेकर्स या संस्थामार्फत 'पेठ     किल्ला  दत्तक घेवून स्वातंत्र्य दिन दिमाखात  अनोख्या पद्धतीने साजरा केला. त्यात इतर गिर्यारोहकांसह सहभाग घेऊन प्रभात फेरी, झेंडावंदन, वक्तृत्व, चित्रकला, हस्तकला इ. स्पर्धासह, १५० रोपाचे वृक्षारोपण, १५० जणांनी नेत्रदान संकल्प करताना, पेठ वाडी व आंबिवली गांवातील शाळांना ग्रंथालयासाठी पुस्तकासह शैक्षणिक व क्रिडा साहित्य तर दिलेच, परंतु गांवातील जेष्ठ नागरिकांचा, महिलांचा व अपंगाचाही हृद्य सत्कार करून महिला बचत गटांना सुवासणीचे वाण देवून गिर्यारोहणाला एक वेगळी उंची आणली.  राजमाची, कोंडिवडे येथेही महिला मुले, आदिवासींसाठीही मदत केली.

अलिकडेच जिवधन, नाणेघाट मोहिमेत, घाटघर गावातील अदिवासी शाळाना  कंम्पुटर, शैक्षणिक, क्रिडा साहित्यासह कपडे, वस्तु, कपाटे वस्तु रुपाने तर दिलीच परंतु तेथील मुलांना आर्थिक मदत करून प्रोत्साहनही दिले. आरोग्य शिबीर भरविले. त्यावेळी स्थानिक सरपंच व नागरिकांनी असा उपक्रम कधी झाला नाही असे भावपूर्ण उदगार काढले.

महाबँक ट्रेकर्स तर्फे इगतपुरी येथील सावली वृद्धाश्रमाला मदत दिली व वृक्षारोपणही  केले. बँक ऑफ महाराष्ट्राच्या अमृतमहोत्सवी वर्षात सारपास मोहिमेत 75 कर्मचारी आणि ग्राहक सहभाग घेताना निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला. ८००० फूटावरील शिला गावातील मुलांना शैक्षणिक वस्तु व खाऊ दिला. महाराष्ट्रातील लोककलांचे दर्शन घडविणारा लोकनृत्यांचा कार्यक्रम कॅम्पफायर मध्ये केला. अपंगानाही यात सहभागी केले.

जगायला उर्मी देणारा हा छंद तरूणांपर्यंत पोहचावा म्हणून जाणिवपूर्वक प्रयत्न केले. त्यासाठी रॉक क्लायबिंग, रॅपलींग इ. च्या शिबिरांचे आयोजन करून मुलांमध्ये साहसी गुणांबरोबर लिखाणाची व नेतृत्वगुण विकसित करण्याची आवड निर्माण केली. या प्रयत्नातच परळ येथील शाळेत सोशल सर्विस लिग ट्रेकर्सची स्थापना केली.

अलिकडेच सामाजिक बांधलकीने अंधेरी येथील शिशु कल्याण शाळेतील गतीमंद मुलांना घेवून सरसगड ट्रेक यशस्वी केला. एप्रिल २०१५ मध्ये युथ हॉस्टेल, मुंबई आयोजित सिक्कीम स्टेहोम उपक्रमात महा बँक ट्रेकर्सचा सक्रिय सहभाग होता. सांस्कृतिक व लोककलांची तसेच खांनपानाची देखील देवाण-घेवाण केली. गिर्यारोहणाला सामाजिक कार्याची जोड देऊन अनेक कार्यक्रम राबविले.

श्रमिक विद्यापिठा कडून सत्कार व मानचिन्ह त्यांना मिळाले आहे. गिरीमित्र गिर्यारोहक सम्मानाने देखील त्यांना गौरविलेले आहे.महाबँकेच्या स्पोर्ट्स क्लब ने त्यांना जीवनगौरव ने भूषविले आहे.

महाराष्ट्र सरकारने 2017 चा गुणवंत कामगार पुरस्कार देऊन भूषविले आहे.

२००८ साली दत्ताची बायपास शस्त्रक्रीया होवूनही सह्याद्री व हिमालयीन पदभ्रमण मोहिमा यशस्वी करून त्यांनी हा छंद चालू ठेवला आहे. त्याचबरोबर अनेकांमध्ये हा छंद रूजवून गिर्यारोहणाला मानाचे पांन मिळवून दिले. टीव्ही- मोबाईल च्या जमान्यात हा छंद वाढवावा म्हणून घेतला वसा टाकणार नाही असा दत्ता फोपे यांचा मनोदयं आहे.  निसर्गाकडून मिळालेल्या ऊर्जेचा सकारात्मक उपयोग जीवनातील संकटावर, दुःखावर मात करण्यास वापरून,जनमानसाना आनंद दयावा आणि आनंद घ्यावा हा त्यांचा मानस आहे।


5 comments:

  1. दत्ता तुझ्या या उत्तुंग कार्याबद्दल तुझे अभिनंदन. छंद जोपासता इतर केलेले सामाजिक कार्य वाखाणण्याजोगे आहे. गेली40वर्षे तुला बघत आहे. तुझ्या पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा. विनोद सावंत 9969945878

    ReplyDelete
  2. खुपच छान . फोपे तुमचा अभिमान आहे आम्हांला .

    ReplyDelete
  3. दत्ता छान अभिमान आहे आम्हाला, तु गाववला तर आहेस व वाडीतील शेजारी आहेस, पुन्हा एकदा अभिनंदन.

    ReplyDelete
  4. मित्रा तुझे अभिनंदन।पुढील वाटचालीस शुभेच्छा।

    ReplyDelete
  5. Many many congrats 👏 n best luck for futures life

    ReplyDelete