लहान पणापासूनच सतीशने खेळाडूवृत्ती जपली आहे. त्याचबरोबर त्याला निसर्गाची व
साहसाची आवड आहे. त्यामुळे त्याची कारकिर्द उल्लेखनीय उपक्रमांनी भरली आहे.
१९८२ मध्ये त्याने उरण ते गेट वे ऑफ
इंडिया हे १५ किमीचे अंतर यशस्वीरित्या पोहून पार पाडले. पुढे १९८४ मध्ये धरमतर खाडी ते गेटवे ऑफ इंडिया हे 42 किमीचे अंतर कापणाऱ्या चार जलतरणपटूंच्या तुकडीचे व्यवस्थापन त्यांनी सांभाळले. शिवाजीपार्क येथील जलतरण तलावात अपंगांसाठी प्रशिक्षक म्हणून काम
केले.
जलतरण करतानाच
त्यांना डोंगर दऱ्यात फिरण्याची देखील आवड निर्माण झाली. मग हिमालयीन मोहिमांचे
वेध लागले. म्हणून त्यांनी १९८४ मध्ये उत्तर काशी येथील नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटनिंगरिंगचा बेसिक कोर्स ‘अ’ दर्जा मिळवून यशस्वीरित्या पूर्ण केला.
त्यांनी प्रशिक्षण पूर्ण
केलेले असल्यामुळे, १९८५ मध्ये मुंबईच्या केव्ह एक्सप्लोरर्स या संस्थेने गढवाल
भागात आयोजित केलेल्या २१,३६४ फूट उंचीच्या
भागिरथी II या हिमालयीन मोहिमेत त्यांना सामील करून
घेतले.
पुढे याच संस्थेने सतीश मधील गुणांची कदर करत, १९८६ मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली
कुमाऊंमधील २०,६७० फूट उंचीच्या अजिंक्य ‘सुली टॉप’ ह्या शिखरावर चढाई केली. संस्थेचा विश्वास
सार्थ करत या चमूचे पहिले पाऊल या शिखरावर पडले.
कान्हेरी लेणी, बोरीवली येथे अॅडव्हान्स रॉक क्लाइंबिंगचे प्रशिक्षण घेऊन ते प्रस्तरारोहण मोहीम
करण्यास सज्ज झाले.
त्यांना प्राप्त
झालेल्या कौशल्यामुळे १९८५ मध्ये नागफणी उर्फ ड्युक नोझची ८०० फूटांच्या प्रस्तर
भिंत प्रथमच आघाडीवर राहून चढण्याचा मान त्यांनी मिळवला.
१९८७ मध्ये त्यांनी मुंबई
पोलिसांसाठी रॉक-क्लाइंबिंगचा कोर्स आयोजित केला होता.
मुळातच फिरण्याची आवड असल्याने त्यांनी सायक्लिंगही सुरू केले
होते. १९८५ च्या मुंबई ते दिल्ली
या राष्ट्रीय सायकल युवा मेळाव्यात त्यांनी सहभागी घेतला. युथ हॉस्टेल असोसिएशन, मुंबई यांनी १९८६
मध्ये आयोजित केलेल्या, मुंबई ते लेह ह्या पहिल्या सायकलिंग मोहिमेत त्यांनी भाग घेतला. त्यात मुंबई वरून निघून समुद्रसपाटीपासून १४,००० फूटांवरील फोटुला खिंडीमार्गे त्यांनी लेह गाठले. तर १९९८ मध्ये मुंबई ते
कन्याकुमारी हे अंतर सायकलने
पार पाडले. ही सायकल मोहिम देखील युथ हॉस्टेल
असोसिएशन, मुंबई यांनी आयोजित केली होती.
एवढेच नाही तर, मुंबई कस्टमने १९८९-९० मध्ये आयोजित केलेल्या सायकलिंग
मोहिमेत संपूर्ण जगातील २४ देश, ३१५ दिवसात पादाक्रांत केले. हे जवळ जवळ २५,००० किलोमीटरहून अधिक अंतर सायकलिंग करत पार पाडताना, तांत्रिक
सल्लागार म्हणूनही त्यांनी काम
पाहिले.
नवनविन साहसाची
उर्मी असल्यामुळे सतिशने १९९४ मध्ये शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींसाठी ‘कोस्टल कोकण’ स्कूटर मोहीम
आयोजित केली होती. १९९४ मध्ये ‘मूनलँड सोनाटा व्हेंचर’ मोहीमे अंतर्गत शारीरिकरित्या अपंग व्यक्तींसाठी, सर्वात जास्त १८,३०० फूट उंच खरंदुंगला खिंडी मार्गे मुंबई ते लडाख अंतर स्कूटरवर पार पाडले.
मग त्यांनी विचार केला, दोन प्रकारच्या साहसी मोहिमा एकत्रित केल्या तर,
म्हणून त्यांनी आगळी वेगळी मोहिम आखली. समुद्रसपाटीच्या मुंबईपासून सायकलवर पायडल मारत १०,००० फूट उंचीवरील लडाख मधील दारच्या
गाठले. आणि तिथून २०,६१२ फूट उंचीचे रॅमजॅक शिखर सर करण्याची पर्वतारोहण मोहीम पार पाडली. केव्हढे हे साहस.
सामाजिक जाणिवेतूनही
त्यांनी काही कार्य केले आहे. ठाणे पोलीस आयुक्तांच्या विनंतीवरून सतीशने नेतृत्व करत १२ जणांना सोबत घेऊन कल्याण येथील हाजी मलंग जवळ दरीत पडलेली दोन मृत शरीरे १९८८ मध्ये काढली. त्याच पावसाळ्यात जांभूळपाडा पूरग्रस्त झाले. तेथे १५ दिवस वैद्यकीय मदत
शिबिराचे आयोजन केले.
इतरही सामाजिक कामात त्यांचे
योगदान आहे. जसे रक्तदान शिबीर आयोजित करणे, बीएनएचएसचे उपक्रम व नेचर कॉन्झर्वेशन प्रोजेक्ट राबवणे. मेळघाट, नागझिरा, नवेगाव, ताडोबा, राधानगरी आणि राजस्थान मधील रणथंभोर व्याघ्र प्रकल्प, कर्नाळा पक्षी अभयारण्य, नंदूर-मधमेश्वर अभयारण्य, मध्य प्रदेशमधील बांधवगड आणि कान्हा अभयारण्य आदी वन्यजीव अभयारण्यांत छायाचित्रण आणि
नेचर लव्हर्स कॅम्पचे यशस्वीरित्या
आयोजन केले.
मे २०१२ मध्ये पोर्टब्लेअर अंदमान बेटांवर आणि नंतर मालवण जवळील सिंधुदुर्ग येथेही स्कूबा डायव्हिंग उपक्रम हाती घेतले. एवढ्यावरच न थांबता जानेवारी २०१३ मध्ये मनाली येथे
स्कीइंगचे छोटे प्रशिक्षण पूर्ण केले.
वन्यजीवन, सायकलिंग, ट्रेकिंग अश्या विविध विषयांवर शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आणि गणेश उत्सव कार्यक्रमांच्या दरम्यान शैक्षणिक स्लाइडशो सादर केले.
अशा या सर्वगुण संपन्न साहसी युवकाचे ‘गिरीमित्र
संमेलनात’, ‘गिरीमित्र गिर्यारोहक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
आता वयाच्या ६० व्या
वर्षी अशाच एखाद्या भन्नाट साहसाचा ते विचार करत आहेत.
सतीश सलाम तुझ्या साहसाला आणि जिद्दीला. खरोखरच नवीन पिढीसाठी तू आदर्श असा दीपस्तंभ आहेस.तुझ्या पुढच्या साहसी आणि जिद्दी वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा. खात्री आहे तू नक्कीच यशस्वी होशील. फक्त कोणतेही साहस करताना स्वतःची काळजी घे.
ReplyDeleteरत्नाकर कपिलेश्वर
Thanks Sir need always blessings from You
Deleteखुप छान माहिती, धन्यवाद सर.
ReplyDeleteSalute to your all-round personality
ReplyDeleteसतीश जी सलाम तुमच्या कार्यकिर्दीला व पुढील व वाटचाली साठी शुभेच्छा
ReplyDeleteधन्यवाद मित्रां
DeleteSatish Great achievement.Congratulations
ReplyDeleteSatish, we are really proud of your achievements, and also of being associated with you
ReplyDeleteGreat personality
ReplyDelete