Wednesday, June 2, 2021

Sahas / Jidd

मासिक 'साहस' उर्फ जिद्द पुन्हा एकदा आपल्या सेवेला

साहस, धाडस, मुखावेगळे छंद या विषयाला, मराठीत प्रथमच वाहिलेले त्रैमासिक साहस नंतर नोंदणीकृत जिद्द हे १९८३ पासून प्रसिद्ध होत आले आहे.

या मासिकाच्या पहिल्या संपादिका होत्या. ख्यातनाम लेखिका सौ. जयश्री देसाई, पूर्वाश्रमीच्या यश्री प्रभाकर अत्रे.

काळाच्या ओघात पाने जुनी झाली, जिर्ण झाली. तरी त्यात प्रसिद्ध झालेले अनुभव, माहिती आज देखिल तितकीच उद्बोधक आहे. नव्या पिढीला त्याची अनुभुती व्हावी व जुन्या पिढीची स्मृती परत जागृत करावी, या उद्देशाने परत एकदा ब्लॉगच्या स्वरूपात त्यातील निवडक माहिती दर महिन्याला थोडी थोडी सादर करण्याचा हा प्रयत्न.

आपल्याला प्राप्त झालेली लिंक आपण आपल्या मित्र परिवाराला पाठवून आपल्याकडे जमा झालेला हा माहितीचा खजिना सर्वदूर पोहोचवाल, अशी आशा आहे.

आपल्या सुचना, प्रतिक्रिया आपण 9987817290 या व्हॉटसअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला नम्र

सुनील राज

संपादक व प्रकाशक

* * * * *

बर्ष १ अक १ ला -  साहस - जानेवारी / फेब्रुवारी / मार्च १९८३

एव्हरेस्ट वीर यासुओ कातो

तुझ्या आयुष्याची ३३ पाने हिमालयात विसावली.

२७ डिसेंबर १९८२ दुपारी तीन वाजून पंचांवन्न, मिनिटांनी

तू एव्हरेस्टवर एकटाच पोचलास.

ऐन थंडीच्या मोसमात तुला जाण्यास कुणी रे सुचवले?

२७ ऑक्टबर ७३ ला हिसाशी इशीयुरू यांच्या समवेत.

दक्षिणेच्या वळशाने तुझी पावले प्रथम एव्ह्रेस्टला लागली;

नंतर ८० च्या कॅलेंडरातही तिबेटच्या मार्गाने तू पुन्हा एव्हरेस्टला गाठलेस

आणि या वेळी मात्र, तुझे तिसरे पाऊल.

८८४८ मीटर्स उंचीचा जीव घेणा बिदु.

तुझी आणि तुझ्या दुर्देवी सहकाऱ्याची पावले.

फक्त १०० मोटर मागे होती.

अत्यंत थकव्याने आणि वाढत्या अंधाराने तो तिथेच थबकला.

आणि तू मात्र पुढे निघालास.

विजयोन्मादाने माघारी वळलास.

तसाच प्रयत्न फ्रेंच गिर्यारोहक बु्ज्या याने केला.

पण, तुमची पावले.

मायभूमीला परत कधी लागलीच नाहीत.

* * * * *

संपादकीय

प्रत्येक माणसाच्या मनात साहसाविषयी एक आकर्षण असतं. तो माणूस भलेही कसल्या साहसाच्या भानगडीत पडणारा असो. पण त्याच्याही मनाला आसमंतातल्या साहसांनी कधीना कधी खुणालेलं असतंच, 'आपलं जीवन अगदीच मिळमिळीत झालंय, ‘आयुष्यात काही तरी थ्रिलींग घडलं पहिजे’, असं त्यालाही कधीतरी वाटलेलं असतं.

आणि रोज नित्य नवी साहसाच्या शोधात भटकणाऱ्या, त्यांच्याबरोबर दोस्ती करणाऱ्यांची तर बातच सोडा. वास्तवाशी जखडून टाकणाऱ्या बंधनांना हलकेच बाजूला सारून साहसाच्या दुनियेत ते केव्हा रममाण झालेले असतात. गड कोटांशी, दऱ्या खोऱ्यांशी, झरा निर्झराशी, पशु-पक्षांशी, वाऱ्या वादळाशी, पासाशी त्यांचे अविरत हितगूज चालू असते. निसर्गाशी जमलेलं हे सख्य संभाळण्यासाठी मग भलेही किती आपत्ती येवो. त्यांच्यातून मार्ग काढून आपल्या जिलगाला भेटायला ते धातच असतात, या अशा साहसी वीरांचा परिचय पल्याला करून देण्यासाठी 'साह' या त्रमासिकाचा खटाटोप.

आज मराठीत मासिके अनेक आहेत. पण दुर्दैवाने या साहसांना समाजापुढे आणण्यात ती कमी पडतात असे आम्हांस बाटते, म्हणून केबळ 'साहस' या विषयाला वाहिलेले एक नियतकाली असावे या कल्पनेने आम्ही हे 'साहस' अंगिकारत आहोत.

माणूस जीवाव उदार होऊन साहस कराला का? कसा? द्युक्त होतो, या साह सफरीत त्याला कोणत्या अडचणींशी सांमना द्यावा लागतो, त्यावर तो कशी मात करतो. शहरातली आकर्षणे बाजूला सारू त्याला निर्जन गडकोटांव, या ऱ्या खोऱ्यांत का भटकावेसे वाटते, भयाण सापांच्या वा अथांग समुद्राच्या सहवासात, त्याला कसले सुख वाटते? या अशा अनेक प्रश्नांचा शोध घ्यायचा 'साहस'चा प्रयत्न राहील.

त्याचबरोबर या साहसी वीरांना एकत्र आणणाऱ्या त्यांना मार्गदर्श करणाऱ्या, त्यांना प्रशिक्षण देणाच्या, अनेक लहाने मोठ्या संस्थांचाही परिचय 'साहस' मधूत वाचकांना करुन दिला जाईल. आमच्या या साहसी पक्रमाला साहसी तसच साहस करणाऱ्या, पण साहसावर मनापासून प्रेम करणाच्या पल्या साऱ्यांचे सक्रिय सहकार्य हवेच.

संपादिका

* * * * *

 ॥ साहसे श्री : प्रतिवसति .... ॥

तु. वि. जाधव



हिमालय हा भारताचा मुकुटमणी...तर सह्याद्री हा दक्षिणबाहू...तसं पाहिलं तर दोघातला फरक जमीन अस्मानाचा. एकाचं सोंदर्य शुभ्रधवल... तर दुसऱ्याचं काळकंभिन्न. पहिल्याची उंची आकाशाची पोकळी मोजणारी. तर दुसर्‍याची इतिहासाची उंची वाढवणारी ... हिमगिरी हा शिवशंकराच्या वास्तव्यानं पुनित झालेला... तर सह्यगिरी हा शिवप्रभूंच्या चरणस्पर्शानं पावन ठरलेला... एक कैलासपती... तर दुसरा सह्याद्रीपती... पहिला ज्ञानयोगी... तर दुसरा राजयोगी.

हिमवंत पर्वतांच्या माथी चढताना. पायाखालचा कडा सरकण्याचं भय. तर सह्याद्रीच्या अंगाखाद्यावर बागडताना चुकून आपलंच पाऊल सरेल पण कडा काही जागचा हलायचा नाही...

असा हा सह्याद्री आहे. ज्वालामुखीचा उद्रेक-धरणी मातेच्या गर्भातुन तिला दुभंगून ... उसळी घेत आकाशाकडं झेपावलेला, दक्षिणोत्तर आठशे मैल पहुडलेला... कणखर... दणकट... राकट... निकट... नी हेकट. अशा था निसर्गनिर्मित सम्राटाच्या उरीशिरी मानवनिर्मितीचा हात फिरला...नी मग मुळातच बलदंड वसलेला हा लोहपुरुष अधिकच बलवंत दिसू लागला.

अश्या या बळवंत लोह्पुरुषाच्या रुपाविषयी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणतात, 'अग्नि आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयातुन सह्याद्रि जन्मास आला. अग्नीच्या धगधगीत उग्र वीर्याचा हा आविष्कारही तितकाच उग्र आहे. पौरुषाचा मूतिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्री... आडदांड सामर्थ्य हेच ह्याचे सॉदर्य... सह्याद्रिचा खांदाबांधा जसा विशाल आहे तितकाच तो आखीव नी रेखीव आहे... दाट दाट झाडी, खोल दऱ्या, भयाण घळी, अतिप्रचंड शिखरे, उंच सरळ सुळके, तुटलेले ताठ कडे, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, भीषण नी अवघड वळणं, घातकी वाकणे, आडवळणी घाट, अडचणीच्या शिडी, दर्लघ्य चढाव, आधारशून्य घसरडे अुतार, फसव्या खोगळ्या, लांबच लांब सोंडा, भयाण कपाऱ्या, काळ्याकभिन्न दरडी नी मृत्यूच्या जबड्यासारख्या गुहा.... ! असे आहे सह्याद्रीचे रुप. त्याच्या कुशीत खांद्यांवर राहायची हिंम्मत फक्त मराठ्यांत आहे. तशी वाघातही आहे. कारण तेहो मराठ्यां इतके शूर आहेत.'

अशा या सह्याद्रिचे बेलाग कडे चढून जाणे, उंतुंग शिखरे पादाक्रांत करणे... आकाशावेरी गेलेल्या दुर्गम सुळक्यांच्या माथी आरोहण करणे... नीं सह्यगिरीनं मोठ्या प्रेमभरी कवतोकानं आपल्या शिरीं मिरवलेल्या असंख्य बुलंद किल्ल्यांचं दर्शन घेणं, हा आम्हा तरुणांस जडलेला नी जखडलेला एक वेडा छंद...!

या माझ्या तरुण डोंगरबंधूंच्या सहस्त्रनामावलीत नेहमी, माझा मी मलाच शोधीत असतो... या अगणितातला नगण्य असा मी, या पंगतोत नेमक माझें स्थान कुठलं? हे सुरुवातीपासूनच मला दिसेनासं झालं आहे, कारण, 'जेथे जातो तेथे मी माझा सांगाती' डोळियांच्या भिंती आड येती...अस्तु!

तर, हा छंद तसा तापदायक. हा खेळ तसा प्राणघातक... तारेबरील कसरतीसारखा.. तलवारीच्या धारेवरून चालल्या सारखा... चुकून जरी पाऊल चुकलं तर मरण अटळ... तिथं दयाक्षमा नाही... असं असता अशा जीवघेण्या कड्यांवर एवढं प्रेम कां? उत्तर अगदी सरळ, साधं नी सोपं आहे. याच काळ्याकभिन्न कड्यांनी आपणास स्वातंत्र्याचे पाठ दिले... याच सुळक्यांनी परकीय आक्रपणाचे ईशारे सर्व प्रथम राजधानीकडे पोहचविले, नी याच किल्यांनी आपणास संकट समयी आश्रय देअून निर्भय केलं ... अश्या या स्वातंत्य देवतेच्या प्रासादांची निसर्ग निर्मीत जडणघडण अगदी जवळून डोळेभरी न्याहाळावी म्हणूनच ही मृत्यूशी झुंज!

हे सारं सह्याद्री वैभव डोळेभरी न्याहाळण्यात एक अनोखा आनंद असतो... सहा ऋतूंचे अनुपम सोहळे ज्यांनी एकवार या गडावरोन डोळेभरी निरखले. त्यांच्यासारखे भाग्यवान तेच. हा आनंद अनुभवताना नकळत हिम्मत पक्की होते... जिद्द बळावते. ती चित्तथरारक साह्सं करण्याकडे आपण नकळत ओढले जातो. या ओढीतली गोडो ज्यानं एकबार चाखली, तो सह्याद्रीशी कायमचा जोखडला गेला...

वितभर पोटाची टिचभर खळगी भरणाच्या.. नी भोगविलासांतच इतिकर्तव्यता मानणारांनी... रोजच्या धकाधकीच्या जीवनात चाकोरी बाहेरचं थोडसं वेगळं जगता यावं म्हणून अधून मधून सवडीनुसार शहरी वस्तीपासून एकवार दूर एखाद्या गडावर जावं. अवघड वाटेनं चढावं... निसणीच्या वाटेनं उतरावं एक दोन दिवस गडावरी मुक्काम ठोकावा... तिथला भन्नाट वारा अंगावर घ्यावा... गड चहू अंगी न्याहाळावा,.. तिथल्या वास्तुंशी एकरुप व्हावं... त्यांच्याशी बोलावं म्हणजे आपोआपच इतिहासाची आवड जागी होते... कोवळी ऊन्हं अंगावर घेत निसर्ग सौंदर्य निरखावं एखादं लेणं अभ्यासावं घटकाभर चांदण्यारात्रीत भटकावं.. मूक यात्रा करांवी आपणाशीच बोलावं.. गच्च दर्द रानातून हिडावं. बख्खळ दगडधोंडांनी खडबडलेल्या काटेरी वाटेनं चालावं... अेखादा मनाजोगा कडा चढून जावा... रणरणत्या ऊन्हांतूत हुंदकणाऱ्या थंडीतून हिडावं... मोठेपण विसरून मुसळधार पावसात चिम्ब भिजावं.. असं केल्यानं अंगी निर्भयपण येतं... हिम्मत पक्की होते... हे सार करीत असता कुठतरी खरचटावं... कंधी पायी काटा बोचावा... कधी सर्वांगी ओरखडे ऊठावे... कधी पाय मुरगळावा... कधी ठेच लागांवी... कधी तहानेने घसा कोरडा पडावा, कधी कडाडुन भुक लागावी... कधी घामात डवरूत निघावं... कघी दमछाक व्हावी... नी मग थोडावेळ कुणा एका तरूतळी दगडाच्या शय्येवर हाताची ऊशी करून 'चवक ताणून द्यावी. असं घडलं की या वेगळ्या जगण्याला थोडसं वेगळेपण प्राप्त होतं... त्याला अद्भुततेची एक धार चढते एक अनोखा आनंद उरीपोटी साठविता येतो... नी मध त्या आनंदाचा सुगंध भवती दरवळत राहतो... आयुष्यभर दुःखात साथ देतो..

तर, अशा या गिरीदुर्गदर्शनास कुणी केव्हा जावं?

उत्तर असे की कुणीही केव्हाही जावं. चित्रकारांनी जावं. भवती पंसरलेलं रंगवैभव डोळीयात साठवून घ्यावं,..!. शब्दप्रेमिकांनी जावं. आपल्या प्रतिभेला केशरी साज चढवून अनामिक धुंदीनं गंधित होअून परतावं... स्थापत्यशारदांनी जावं, तेथील बांघ कामाची जडणघडण ध्यानी घ्याबी... युध्दशास्त्राच्या अभ्यासकांनी जावं. तेथील सामुग्रीतले बारकावे ध्यानी घ्यावे... नी शेवटी जावं आमच्यासारख्या सर्येसामान्य भाविकांनी, अनेक आपत्तींनी गांजलेल्या नी गंजलेल्या या कृश देहाच्या भाळी तिथल्या पायधुळीचं एक बोट टेकण्यासाठी... ध्येयाचा नंदादीप अखंड तेवत ठेवण्यासाठी नानाविध आपतींशो झुंज देणाऱ्या त्या सकलः स्थितीच्या निर्धारूचं नी निश्चयाच्या महामेरूचं आत्मिक श्रध्देनं पुण्यस्मरण करण्यासाठी... प्रत्येकानं हे एकवार करून पहावं नी घरी परतल्यावर अंतःर्मुख होअून स्वत:स शोधावं.. निश्चितच काहोतरी फरक झालेला दिसेल, एखादा स्फूर्तीचा किरण डोकावतांना दिसेल... बुरसटलेल्या चित्तवृत्तींला नवीन धुमारे फुटत असल्याची जाणीव होईल... आळसावलेल्या रक्ताच्या मर्यादित डबक्यातून चैतन्य गंगेचा प्रवाह वाहताना दिसेल.

माती, दगड, वनश्रीनी आकाश दर्शनाच्या अभ्यासकांना इथून खूपखूप घेण्यासारखं आहे. तसंच देण्यासारखेही... पण मला मात्र, इथली माती नी खडकात लवलवणारी गवताची उभार पाती दिसली की ओठावाटे नकळत प्रा. वसंत बांपटांच्या काव्यपंक्ति बाहेर पडतात...

धिक्‌ तुमचे स्वर्गही साती

इथली चुंबीन मी माती

या मातीचे कण लोहाचे

तृणपात्यांना खड्गकळा

कृष्णेच्या पाण्यातूनी अजूनी

वाहतसे लाव्हा सगळा'

श्री. स. आ. जोगळेकर आपल्या सह्याद्रि स्लोकात म्ह॒णतात-

सह्याद्रिची पुजा ही मातृभूमीची पूजा... भारतमातेची पूजा...

महादेवाची किवा महाशक्तिची मंदिरे आपल्या शिरी घारण करणारी शिखरे ही सह्याद्रीच्या पावित्र्याची प्रतिके... त्यांचे दर्शन हे सह्याद्रीच्या पावित्र्याचे पुजन... गडकोटांचे दर्शन हे सह्याद्रीच्या स्वातंत्र्यप्रेरकतेचे पूजन...

लेण्यांचे दर्शन हे सह्याद्रिच्या संस्कृतीचे पुजन

पाटपाणी व पाणवीज यांचे दर्शन हे सह्याद्रिच्या आदिशक्तीचे पूजन...

सह्याद्रिच्या विविध शक्‍तींचे पुजन, दर्शन, ध्यान, आराधना केल्यानं फलप्राप्ती काय होते?

शरीर कणखर होते.

कणा ताठ होतो

छाती रुंदावते

मन प्रसन्न होते

चित्त शुद्ध होते

दृष्टिक्षेत्र विस्तारते

आकांक्षा उंचावतात

शौर्य धैर्य प्राप्त होते

निष्ठा दृढ होते

कर्तृत्व प्रखर होते.

श्रमशक्ति वृद्धिंगत होते

प्रतिकारशक्ति प्रज्वलित होते

दारिद्रयाची कदर व संकटाची डर नष्ट होते.

स्वार्थत्यागाची व अंगीकृत कार्यावर लक्ष केंद्रित करण्याची प्रेरणा होते.

थोडक्यात सांगायचे म्हणजे या व्रतामुळं अंगी मराठी बाणा येतो आणि हा ज्याच्या अंगी असेल त्याच्याजवळ नाही असं जगात काय आहे?

ही स्वानुभवाची सुगंधी शब्दपुष्यं आहेत... अंधश्रध्देचे केवळ पोकळ बुडबुडे नाहीत.

* * * * *

डोंगर गीत

हे पर्वत हे डोंगर

ही नदी हे नाले

हे दोस्त अमुचे

आमच्या संग चाले.

हा गाणारा वारा

आमचे गीत गाई.

असो गार वारा

असो उष्ण धारा

हा प्रवास खडतर

करतो मजे खातीर

नागमोडी ही चाल

सुखावते फार

कुंजती हे खग

मनमुराद विहंग

लता वृक्ष सारे

असे आम्हास प्यारे

उंगवता तो सूर्य

स्फूर्ती देतो आम्हांस

हा निसर्ग अमुचा

असे माय बाप

हि भूमी आम्हांला

सुख देते अमाप

जीवन आहे गीत

जीवन आहे प्रीत

चला चाखू या

मौज या जीवनाची

व्यर्त नका घालवू

क्षण या जीवनातील

महेश सावंत, एम. डी. कॉलेज (परेल)

* * * * *

पाताळाचा वेध

नितिन परळकर




छाती एवढ्या पाण्यातून, गुडघाभर चिखलातून, वटवाघळांच्या किचकिचाटात चाललेला त्यांचा प्रवास पावलोपावली जिवावरचं दडपण वाढवत होता. त्यात पाण्यात पडलेली त्या निशाचरांची विष्ठा, त्यांचे मृतदेह, यांच्या कुजून झालेल्या मिश्रणातून वाट काढणे हे काही सोम्या गोम्याचे काम नव्हते, पण एवढ्याशा गोष्टीला घाबरले तर ते शिलेदार कसले! ज्या ठिकाणाला गेल्या दोन-तीन शतकात मनुष्य प्राण्याचा पदस्पर्श झाला नव्हता, अश्या वर्तमान स्थितीला अनभिज्ञ असणाऱ्या त्या भुयारातून प्राण पणाला लावून हे सात शिलेदार पावलो पावली थबकत कानोसा घेत पुढचे पाऊल टाकण्याची जागा काठीने चाचपून पाहात गजगतीने पुढे सरकत होते; पाण्यावर तरंगणारे वटवाधळांचे मृतदेह, त्यांची विष्ठा हाताने बाजूंला सारीत, त्याच्या कुबट दुर्गंधीयुक्त. वासाने बेजार होणारे डोके शांत ठेवण्याची शिकस्त करीत, त्यांचा प्रवास चालू होता. अंगाला लागणाऱ्या जळवांचे तर त्यांना भानच नव्हते. त्यांचं चित्त लागले होतं एका गूढाकडे, अज्ञात वासाच शोध घेण्याकडे "पाताळांचा वेधत्यांना घ्यायचा होता. स्वत:च्या जिवाची त्यांना काहीच पर्वा नव्हती, त्यांचा प्रवास सुरू होता आणि अचानक समोर पाहिलेल्या दृश्याने सातही जण जांगच्या जागी थबकंले अनामिक भीतीची एक लाट त्यांच्या अंगावरून गेली. त्यांची हालचाल अचानक थांबली. नव्हे, थांबवावी लागली आणि अगोदरचं भयांण वाटणाऱ्या वातावरणात भीतीची भर पडली, आता पर्यंत मिळत असळेला विजय त्यांना स्वहस्ते पराजयाच्या स्वाधीन करावा लागला कारण... कारण समोर ठाकलेला पातळ सम्राट, पिढ्यान्‌ पिढ्या मानव जातीवर पकड ठेवून आहे, आणि म्हणूनच लोक ज्याची श्रद्धेने पूजा करतात, अशा नागराजांची स्वारी समोर अवतरलेली पाहून ते सातही शिंलेदार मनोमनी हादरले. क्षणभर का होईना पण त्यांच्या शरीराचा थरकाप उडाला, तरीही तो पाताळाचाराजा अविचल होता. आपल्या प्रदेशात "येणाऱ्या आगंतुकांचे ना त्यानं स्वागत केले की ना त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. जणू तो समोर असलेल्या ह्या साहसी वीरांच्या मनाचा शोध घेत होता.

भानावर आलेल्या शिलेदारांनी मात्र आपत्या परीने ह्या नागाला आपल्या विजयपथावरुन बाजून करण्याचे अनेक प्रयत्न केले. विनवण्या झाल्या, धमक्या देऊन झाल्या तहाची बोलणी झाली, तरीही नागराज नमला नाही. त्याने आपला पविंत्रां कायम राखला आणि आपले पाताळ नगरीचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यात नागराज यदास्वी झाले.

मग सुरू झाला परतीचा प्रवास, पुन्हा तेच छाती एवढे पाणी, त्यातले ते कुजके मृतदेह, विष्ठा, त्या रक्‍त पिपासु जळवा आणि सोबतीला तो कुबट' घाणेरडा वास, नी हातातोंडाशी आलेला विजय गमावल्याचे दुःख न करता त्या सातही वीरांनी आपला पराभव खिलाडू पणाने स्विकारून परतीचा प्रवास सुरू केला. तोष 'मुळी पुन्हा येऊन विजय मिळवण्याच्या निश्‍चंयाने. प्रवास जरी आल्या मार्गाने असला तरी. तेथे कोणी पायघड्या अंथरल्या नव्हत्या, की रोषणाई केली नव्हती.

अशा कष्टप्रद अंधाऱ्या वाटेने ते आले होते ती मार्ग त्याना पार करायचा होता. नाही म्हणायला एकच गोष्ट त्यांच्या फायद्याची होती. ती म्हणजे रस्ता ओळखीचा होता, कारण ह्याच वाटेते आलेले असल्यामुळे परिस्थितीची जाणीव होती. वाटेत येणाऱ्या संकटांचा सराव झालेला होता. वातावरणाची सवय झाली होती. घाणेंद्रिये तर कामच करत नव्हती. तब्बल चार तासांनी ते भूगर्भातून बाहेर आले. तेव्हा, कपड्यांबर वळवळणाऱ्या असंख्य किड्यांच्या दर्शनाने क्षणभर त्यांचा मेदूच बधीर झाला. स्वत:च्या देहाची त्यांना शिसारी आली; पण दुसर्‍याच क्षणी त्यांनी आपल्य़ा मनावर लगाम घालून, ते कपडे काढले, नव्हे लांब नेऊन फेकून दिले. दुसरा इलाज नव्हता, दोन दोन वेळा स्नान केल्यावर, त्यांनी सुसंस्कृत माणसाचा पेहराव चढवला. आता ते सामान्यजनाप्रमाणे वाटत होते.

कोण होते हे सात तरुण? काय मिळणार होते त्यांना एवढे जिवावर उदार होऊन? काय काम होते त्यांचे त्या भुगर्भात? कश्यासाठी एवढा हा आटापिटा? अश्या अनेक प्रश्‍नांचे वादळ डोक्यात सुरू झाले आणि मी माझ्य़ा मोहीमेवर निघालो. ह्या वेड्या, मूर्ख, उपदव्यापी, किंवा संशोधक साहसी वृत्ती असणार्‍या तरुणांच्या शोधात... नवलाईने नटलेल्या मुंबापुरीचे रहिवाशी असलेल्या ह्या सात तरुणांनी रेवदंड्यांच्या भुईकोट किल्ल्यात असलेल्या भुयाराचा मागोवा घेतला. तेव्हा त्याना हा अनुभव आला.

रेवदंड्याजवळ असलेल्या भुईकोट किल्ल्यात भुयार असल्याची कुणकुण ह्या चमूना लागली आणि ८२ सालच्या जुले महिन्यात ११ तारखेस रविवारी हे सात वीर शिलेदार ह्या? भुयारात प्रवेश करते झाले. अरूण सावंतच्या नेतृत्वाखाली हिरा पडीत, दत्ता फोपे, अनंत सावंत, रमाकांत महाडीक, हेमंत पांचाळ आणि यशवंत सावंत असे हे सात सहकारी सगळे उत्कृष्ट गिर्यारोहक. धाडस, चिकाटी, अभ्यांसूवृत्ती यांचा मेळ त्यामुळे जबाबदारीची जाणीव प्रत्येकाला होतीच, रेवदंड्याचा रहिवाशी अनंत सुर्वे त्यांच्या ह्याच गुणामुळे साथ देण्यास तयार झाला..

गुढघाभर पाणी असलेल्या चिचोळ्या वाटेत ते आत शिरले खरे पण जसे जसे पुढे जावे तसे पाण्याची पातळी मात्र बाढत होती. त्यात पायाखालचा चिखल पण वाढत होता. प्रत्येक पाऊल टाकताना जपून टाकावे लागत होतं. काठीने जागा चाचपडून पहावी लागत होती. मध्येच एखादे फसवे विवर असण्याची शक्‍यता नाकारता येत नव्हती. मोहीम प्रमुख ह्या नात्याने पूढे असलेल्या अरुणला ह्या गोष्टी तर पहाव्या लागतच, पण मागून येणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांची पण काळजी घ्यावी लागे.

पाण्याची पातळी थेट छाती पर्यंत येऊन पोहोचली होती. दोन-तीन शतकात माणसांचा संबंध नसल्यामुळे वटवाघळांची वाढ बेसुमार झालीं होती. त्यांची विष्ठा पाण्यांत पडून कुजत होती. मेलेली वटवाघळे पाण्यावर तरंगत होती. त्यामुळे पाण्यात अनेक तर्‍हेचे किडे वळवळत होते. एक प्रकारचा कुबट दुगंधीयुवत अंगावर काटा उभारणारा. वास वातावरणात पसरला होता, त्यात जळवांचा सुळसुळाट!

अश्या अवघड परिस्थितीत आजुबाजूला घोंघावणाऱ्या वटवाघळांमधून, गुडघाभर चिखलातून त्यांचा प्रवास चालू होता. अंधार मी म्हणत होता. सोबत घेतलेल्या विजेऱ्यातील सेल्स तेथील थंड हवेमुळे लवकर संपत होत्या. कितीही विजेऱ्यांचा प्रकाश झोत सोडला. तरी उजेड जाणवत नव्हता. अंधार जणू प्रकाशाचे शोषण करत होता.

रेवदंड्याच्या त्या भईकोट किल्ल्याखाली हे भुयार आहे तो किल्ला पोर्तुगिजांनी बांधल्याचे आढळते. किल्ल्याच्या पहाणीत ह्या मंडळींना एका बुरुजावर शिलालेख लिहलेला आढळला. त्याचा मजकूर पुढील प्रमाणे होता...

या इमारतीला चौकोनी बुरुज म्हणतात. हा पोर्तुगीज लोकांनी आपल्या कारखान्यासाठी इ. स. १५१६ साली बांधला. ह्याची तटबंदी सन १५२१ ते १५२४ ह्या दरम्यान करण्यात आली.

ह्या शिलालेखावरून हे स्पष्ट होते की ह्या वास्तुस आज मीतीस ४७० वर्षाहून अधिक कालावधी उलटला आहे. किल्ल्याच्या तटबंदीचा घेर ५ कि मी. असून त्या खाली वर उल्लेखित तीन मी. रुंद ब दीड मी. उंचीचे मानव निर्मीत भुयार आहे वर्तमान स्थितीला ह्या भुयारात शिरण्यासं एकूण सहा मार्गे अस्तित्वात आहेत. पैकी दोन मार्ग बंद असुन चार पैकी दोन मार्ग आतून एकामेकांना मिळालेले आहेत. त्यांची लांबी साधारण ५०० फुट आहे. उरलेल्या दोन मार्गांची तोंडे दगड विटांनी चुना लिंपून बंद केलो आहेत. एकमेकांपासून लांब असलेळे हे सहाही मार्ग आतून भुयारांनो जोडलेले आहेत. भुयारात हवा खेळती राहण्यासाठी प्रत्येक दहा मीटसं वर किल्ल्याच्या पृष्ठ भागावर उघडणारे साधारण दहा मीटसं उंचीचे झरोके आहेत.

पावसाळ्यात पाण्याबरोबर येणाऱ्या मातीमुळे तळाशो ८ ते १० फूट उंचीचे मातीचे ढीग साठलेले असुन मार्गक्रमणासाठी हे ढिगारे फोडून वाट तयार करावी लागे.

त्यात वळवळणारे किडे पाहून पाय पुढे जाण्यास तयार होत नसत. तशाही परिस्थितीत एकामेकांना धीर देत एकामेकांचा उत्साह वाढवत पुढे सरकणे चालू होते. एका मागोमाग एक झरोके लागत त्या खाली साठलेल्या मातीच्या ढिगावर वळवळणारे किड दिसत आणि रांगत जाण्याएवढी वाट करून त्या ढिगाऱ्यावरून किड्याप्रमाण जावे लागे. पुन्हा छाती एवढे पाणी स्वागत करी. अश्या परीस्थितीत सोबत आलेला गावकरी घाबरला. त्याच्या मनावरचा ताबा सुटला तो वेड्या सारखे करू लागला. परत फिरण्याच्या विनवण्या सुरु केल्या. त्याची समजूत घालताना नाकी नऊ येऊ लागले. प्रवास अखंड होता. संथ होता. पण सतत होता. आणि सतरावा झरोका दृष्टिपथात आला त्या खाली साठलेला मातीचा ढीग विजेर्‍यांच्या उजेडात स्पष्ट झाला, तेव्हा सगळे हादरले क्षण दोन क्षण सुन्न झाले. समोर ऐटीत बसलेला नागराज पाताळ नगरीचा राजा जणू त्याने ह्यांच्या अश्वमेघाचा घोडाच अडवला होता. इतर वेळी नाग-सर्पांना न घाबरणाऱ्या ह्या बिलेदारांना मात्र त्या ठिकांगी माघार घ्यावी लागली. भुगर्भातील त्या छाती एवढ्या पाण्यात त्यांच्या भुपष्ठावरील हालचालींना मर्यादा पडत होत्या. समोर मातीच्या ढिगाऱ्यावरल्या नागाशी पाण्यात राहून लढणे, ह्या वीरांच्या युद्धनीती धर्मात बसणार नव्हते. शांतपणे त्यांची पावले माघारी वळली.

* * * * *

तोरण्यातील रात्र

विद्याधर बिर्जे

असाच आमचा राजगड तोरणाचा एक ट्रेक. आता पर्यंत चार वेळा हा ट्रेक. मी पुरा केलाय. पहिल्या दिवशी आमचा मुक्काम राजगडच्या पद्मावती मंदिरात झाला. पहाटे उठून लवकरच तोरण्यास जायचे, या विचाराने झोपी गेलो.

झोपताना माझ्या नजरेसमोर दोन मार्गे दिसू लागले. पहिला राजगड-तोरणा डोंगर सोंडेवरून जाण्याचा व दुसरा राजगड उतरून वाजेघर, बामनखड, वेल्हामार्ग. पहिला मार्ग किंचित अवघड, घोकादायक, परंतु जवळचा. तर दुसरा अत्यंत सोपा पण दूरचा. माझे काही सहकारी प्रथमच ट्रेकींग करत असल्याने आम्ही दुसरा सोपा मार्ग अवलंबिला.

दुपारपर्यंत आम्हीं वेल्ह्याला पोचलो. जेवणपान करून भर दुपांरच्या उन्हातच तोरणा चढण्यास सुरवात केली. तोरणा किल्ला पुणे परिसरात सर्वात उंच किल्ला (४६०० फूट) असल्यामुळे चढण्यास खूपच वेळ लागतो. आम्ही गड चढण्यास प्रारंभ केला पण सर्वांच्या मनात सायंकाळी सहाची पुणे एस. टी. पकडण्याचा विचार सतत जागता असल्यामुळे सायंकाळी साडेपाच पर्यन्त किल्ला पाटून आम्ही पायथ्याशी परतलो.

एसटीत बसून स्थानापन्न झालो. गाडी सुटण्यास फक्त पांच मिनिटांचा अवधी होता. एवढ्यात माझा नाशिकचा मित्र नितीन पुराणिक मला वैतागून म्हणाला, 'बिर्जे, खरचं तू भित्रा रे. म्हणूनच या सोप्या मार्गाने आलास. आपला ट्रेक अगदी कंटाळवाणा झाला बघ. सारी मजाच तुझ्या सोप्या मार्गामुळे निघून गेली,'

एवढे नितीनचे सहज बोलणेही मला चांगलेच खटकले. थोडा वेळच मी विचार करण्यास घेतला. आणि कोणताही मागचा पुढचा विचार न करता नितिन पुराणिक बरोबर पुन: त्याच रात्री तोरणा चढण्याचा विचार मी जाहीर केला. अर्थात माझ्या मित्रांनी आमच्या मूर्खंपणाला खूप विरोध केला. पण आता आम्ही दोघे जिद्दीला पेटलो होतो. ताबडतोब गाडीतून उतरून रात्रीच्या प्रवासाची पुर्व तयारी करू लागलो. थोडे खाण्याचे जिन्नस गावातून खरेदी केले. विलास जोशी हा सुद्धा आमच्या बरोबर येण्यास तयार झाला.

आमच्या पायाखालची वाट ओळखीची पण आमची वेळ अनोळखी होती. असा सर्व मामला होता. आसपास भीषण स्मशान शांतता व आम्ही तिघेजण न बोलता नुसते चुपचाप चालत होतो व चढण तर संपता संपत नव्हती. शेवटी एकदाचा प्रवास संपला. गडावरच्या एका पडक्या देवळात आमचा मुक्काम होता.

हे देऊळ तितकेसे बंदिस्त नव्हते. आसपास जंगल असल्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती वाटत होती. त्यात आम्ही फक्त तिघेच. बाजूला रातकिड्यांची किरकिर चालूच होती. मनात कारण नसताना काल्पनिक भीती निर्माण होत होती. ती झटकून टाकण्याचा प्रयत्न आम्ही सतत करीत होतो. परंतु वातावरणाचे दडपण काही केल्या दुर होत नव्हते.

प्रथम जर आम्ही कोणती गोष्ट केली असेल तर पिण्यासाठी, जेवणासाठी पाणी भरून ठेवणे. बॅटरीच्या उजेडात आम्ही पाण्याची टाकी शोधून काढली. व पाणी भरून घेतले. नंतर भली मोठी शेकोटी पेटवली व त्याच्या उजेडात आसपासचे मोठे मोठे दगड उचलून आणण्याचा उद्योग सुरु केला. जवळ जवळ एक तास आमचा हा उद्योग चालू होता. पुरेसे दगड गोळा होताच देवळाच्या सभोवार दगडांची एक बंदिस्त भिंतच तयार केली व कोपर्‍यात तीन दगडांची चूल पेटवून विलास व नितिन जेवणाच्या तयारीला लागले. तोपर्यन्त एका हातात पेटती मशाल घेऊन रात्रभर शेकोटीला पुरेल एवढा लाकूड फाटा आसपास फिरून मी गोळा केला. खुपसे वाळलेले गवत गोळा करून मस्तपैकी तीन बिछानेपणे तयार केले. तोपर्यंन्त आमच्या आचाऱ्यांनी मस्तपैकी पिठले-भात, कांदा, लसूण चटणी वगैरे जेवण तयार केले. आमच्या मनातील काल्पनिक भीती आता पार पळून गेली होती. दिलखुलास गप्पागोष्टी करीत आम्ही जेवणावर ताव मारला व पोटभर पाणी पिऊन समाधानाची ढेकर पण दिली.

नंतरची पुरी रात देवळात कोंडून घेण्यापेक्षा चंद्र प्रकाशात गडाचा परिसर पहाण्यास, आम्ही बाहेर पडलो. प्रकाश म्हणून आमच्या हातात फक्‍त बॅटरी व मशाली होत्या. वातावरणात थंडगार झोंबरे वारे वहात होते. त्यात कडाक्याची थंडी पडली होती. रातकिडे ओरडत होते. मध्येच त्यात जंगली झाडीतून कुठेतरी धूसफूस व्हायची. तिची विशेष दखल न घेता रात्रीच्या भयाण शांततेत चक्क गाणी गुणगुणत आम्ही चालत होतो. दूर क्षितिजावर सिंहगडाच्या मनोऱ्यावरील लाल दिवा आमच्याकेडे बघून डोळे मिचकावित होता. तर पायथ्याशी वेल्हे गावातील विद्युतदिवे काजव्यासारखे चमकत होते. तर खूप लांब अंतरावरील विंझर, वाजेघर, पाली वगैरे गावातील दिवे अस्पष्ट दिसत होते. रात्रीच्या दाट काळोखात, खूप उंचावर आम्ही जणू पायाला चक्र लागल्याप्रमाणे डोंगर पालथा घालत होतो. पायथ्याशी बसलेल्या गावकऱ्यांना कल्पना देखील नसेल की तीन वेडे वरती गडावरून एवढ्या रात्री फिरत असतील म्हणून, एक वेगळाच धुंद करणारा अनुभव आम्ही घेत होतो.

सुमारे दोन तास मनसोक्त फिरून आम्ही परत देवळाकडे परतलो व रात्री झोपी गेलो. तोरणा गडावर त्या पडक्या देवळात त्या रात्री फक्त तिघेजण होतो. अंथरुणावर पडल्यावर प्रथम झोपच येत नव्हती. ती चांदणी रात्र, ते पडके देऊळ व आम्ही फक्त तिघेजण. मनात असंख्य विचारांची गर्दी झाली होती. माझ्या स्मरणातुन, तोरण्यावर आम्ही तीन मित्रांनी काढलेली रात्र कधीही विसरली जाणार नाही.

* * * * *

एक पत्र

हिमालयाच्या कुशीतील

जाणा कॅम्पवरून

सुहास केसरकर

प्रिय,

सुनिल राज,

काल आम्ही 'जाणा' कॅम्पला-आलो समुद्र सपाटीपासून ७६०० फूट उंचावर अगदी हिमालयाच्या कुशीत हा विसावला आहे.

रायसनवरून निघताना आम्हाला एक सफरचंद, ज्यूसचा छोटासा पॅक डबा. पॅरीच्या गोळया, चॉकलेटस वगैरे खाणे मिळाले होते. आम्ही चालत असताना हे सर्वं पदार्थ लवकरात लवकर तोंडात टाकण्याची आम्हाला अगदी उत्सुकता लागली होती. अर्ध्या तासातच प्रत्येकाने आपल्याकडचीं गोळ्यांची पॅकेटस सोडायला सुरुवात केली, आणि आम्ही बियास नदी वरचा झुलता पुल पार करण्यास सुरूवात केली. हा पूल संपूर्ण लाकडाचा आहे. व त्याला लोखंडी दोराने वर उचलून धरलेले आहे. मध्यभागी गेल्यावर पूल खरोखर झोपाळ्यासारखा झूलतो. तोल संभाळताना

अगदी नाकीनऊ येतात. आता आपणाला खाली नदी गिळणार असचं वाटतं.

नदी पार केल्यावर मात्र खूप चढण आहे. ही चढण जाणायेइपर्यंत संपतच नाही, चढण चढता संपत नव्हती. आणि आम्हाला एकूण किती उंच फुटांचा पल्ला गाठायचा होता माहिताय? तीन हजार फुटांचा! इतक्या उंचीवर चढायचं होतं. शिवाय नऊ कि, मी. चालायचं होतं. मधेमधे विश्रांती घेत घेत आम्ही पुढे चाललो होतो. इकडचे वातावरण फार आल्हाददायक आहे. थकावट अशीं जाणवत नाही. माझ्या पायाला अगदी टरटरून फोड आले होते. तरी पण पुढे पाऊल टाकण्याशिवाय गत्यंतर नव्हते, पाठीवर ओझे वाहून संपूर्ण चढण पार करताना अगदी दम लागत होता. पण आजुबाजूचा निसर्ग आमचं मन सतत ताजं तेवत होता. डोळे ते सोंदर्य साठवून ठेवायला अपुरे पडत होते.

प्रिय, इकडच्या झाडांबद्दल खुपच लिहिण्यासारखे आहे. मला ती आपल्या इकडच्या झाडांसारखी अजिबात वाटली नाहीत. 'टरपेंटाईन', स्प्रक्स,' 'देवदार' ही झाडे सगळी उंच सरळ सोट गेलेली आहेत. फांद्या म्हणून बघायला गेलो तर दिसणारच नाहीत. सुवासिनी सारखी हिरवी साडी नेसलेले हे वृक्ष होते. इकडच्या झाडांना जणू शरद ऋतु माहितच नाही. वेगाने वाहणार्‍या वाऱ्यापासून त्यांना सतत आपला बचाव करावा लागतो. आणि सूर्यप्रकाशासाठी त्यांना सतत उंचावर जावे लागते. आम्ही हिमालयात प्रवेश केला नि दोन डोळ्यांनो किती बघू नि किती नको असे होऊन गेले. बर्फाच्छादित शिखरे गाठण्यासाठी आम्ही पुढे पुढे जात होतो तर ती तितक्याच वेगाने आमच्यापासून लांबलांब जात होती. थंडीपासून संरक्षण म्हणून जणू काही हिमालयाने कापूस पिंजून पांघरला होता. त्या कापसात बागडायला आमचे मन सारखे पुढेपुढे जात होते. आमची मने केव्हाच बर्फात बुडून गेली होती. त्यांना बर्फाची थंडाई बिलकूल जाणवत नव्हती, पण हा देह त्याच्या बरोबर इतक्या वेगाने जाऊ शकत नव्हता. इथल्या पाण्याची गंमत म्हणजे अगदी गारेगार तितकेच चवदार. वॉटर बॅगचा काहीच उपयोग नाही. इथल्या कावळ्यांमध्ये सुद्धा वैशिष्ट्य दिसले. आपल्या इकडच्या कावळ्यापेक्षा खूप मोठे. जशी या प्रदेशातील माणसे धडधाकट आहेत. तसेच इथले कावळेसुद्धा तब्बेतीने मस्त आहेत.

असा आमचा एक प्रवास चालू असतानाच पाठीवरच्या पॅक लंचची सारखी राहून राहून आठवण येत होती. पण स्वतःकडचा स्टॉक संपल्यानंतर सायंकाळी साडेसात पर्यन्त काही मिळणार नव्हतं. म्हणून जिभेवर संयत राखणे भाग होते; तरी पण ११ वाजेपयंन्त कसातरी तग धरून मग न राहून डबा उघडलाच. पॅक ल॑च काय होता माहीत आहे? तोंडाला पाणी सुटलं तुझ्या, सुनील?, पाणीविणी सुटण्यासारखा लंच काही नव्हता. फक्त मोजून पुर्‍या पाच व हिरव्या वाटाण्याची सुकी भाजी, बस. असा 'अधाशासारखा तुटून पडलो की पुऱ्या कधी संपल्या कळलेच नाही, शेजारच्यांना विचारलं, पुऱ्या कोणाला जास्त होताएत कां? पण प्रत्येक जण दुसर्‍यांकडून तीच अपेक्षा करीत होता, तरी उरलेलं रिकामं पोट पाण्याने भरून घेतले. जेवणानंतर झाडाखालीच सावलीत आराम केला रानात असं जेवायची खूप मजा येते.

शेवटी मजल दरमजल करीत दुपारी दोनच्या कडाक्‍यास 'जाणा'ला पोचलो. कॅम्पची साईट फारच सुंदर, आमचे तंबू अगदी झऱ्याच्या काठावर एका रांगेत होते, आता आम्ही, अगदी ७५०० फूट उंचांवर पोचलो होतो. पाणी बर्फापेक्षा थंडगार अशी स्थिती, अगदी २०० ते ३०० फूट उंच वृक्षाच्या जंगलात आम्ही पोचलो होतो. सायंकाळी झालेल्या चहापानानंतर साडेसात कधी वाजतात असे झाले होते. कारण पोटात नुसते कावळे ओरडत होते. त्यामुळे जेवणाच्या शिटीकडे सर्वाचे कान लागले होते.

त्याआधी आमची ओळख परेड झाली. लहान सहान खेळ झाले. इथं भ्रालूंचा फार धोका म्हणून आम्ही सर्व लवकरच कॅम्पवर आलो. तेवढ्यात पावसाचे आगमन झाले. थंडी जास्त जाणवू लागलीं. आम्ही अगदी हातमौजे, स्वेटर, मफलर इत्यादी सरंजाम चढवून जेवणाची वाट पहात राहिलो. अखेरीस सायंकाळी साडे सात वाजता जेवणाची शिटी वाजली.

चप्पल घालून जेवण घ्यायला निघालो. सगळीकडे पावसामुळे नुसता चिखल झाला होता. त्यात भुकेकडे सर्व लक्ष केंद्रित झाल्यामुळे, कुठे आपण पाय ठेवतो. यावर अजिबात लक्ष नव्हते. आणि पाय निसटला मात्र सरळ आडवा झालो. जेवणासाठी साफ धुतलेल्या ताटात भाता अगोदर चिखल पडला. तरी हातावर सावरलो म्हणून नाहीतर सगळाच चिखलात माखलो असतो. माझ्यानंतर आणखीन आठ-दहा जणांनी असेच साष्टांग नमस्कार घांतले.

 पाऊस थेंबेथेंबे पडतच होता. त्यांत थंडी मी म्हणत होती. पावसामुळे कॅम्प फायर होऊ शकले नाही. आता झोपण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. खाली दोन ब्लॅंकेट व पांघरायला दोन ब्लॅकेटस असं करून झोपी गेलो. दिवसभराच्या थकव्याने झोपही लवकर आली.

आजची प्रभात फार आल्हाददायक आहे इथून 'माटीकचोर' कॅम्पसाठी आम्ही प्रयाण करीत आहोत. तेव्हा पुढील कृत्तात्त आगामी कॅम्पवरून. तुर्त इथेच थांबतो. कळावे, लोभ वगैरे आहेच.

तुझा स्नेहांकित,

बंडू

* * * * *

प्रख्यात मोटार शर्यतपटू सुरेश नाईक यांचे दुःखद निधन

गेली बारा वर्षे मोटार शर्यतीतील एक अग्रणी श्री. सुरेश नाईक यांचे मुंबईतील शीवच्या टिळक रुग्णालयात १ फेब्रु. ८३ रोजी दु:खद निधन झाले. बंगलोर येथील मोटार शर्यतीत ते विजयश्री खेचून मुंबईस परतताना गेल्या डिसें. ८२ मध्यें बागलकोट जवळ त्यांच्या मोटारीला अपघात झाला होता. त्यावेळी बेशुद्धावस्थेतच त्यांना टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अवघ्या ४६ व्या वर्षी मोटार शर्यतीत विजयश्री मिळवून घरी परतताना झालेल्या अपघातातच त्यांची प्राणज्योत मालवावी ही खरोखरच दुःखद घटना होय.

श्री. नाईक यांचे वैशिष्ट्य म्हणजे १९७० पासून अनेक मोटार शर्यतीत ते पारितोषिके मिळवित गेले. त्यांची विशेष कामगिरी म्हणजे १९८० मध्ये झालेली हिमालयीन रॅली, १९७६ची बंगलोर मोटार स्पोर्टस क्लब शर्यत, आणि ७५ मध्यें झालेली मद्रास मोटार स्पोटर्स क्लब शर्यत होय.

त्यांच्या पश्‍चात पत्नी व तीन कन्या असा परिवार आहे.

* * * * *

 हिमालयातील सफर

संध्या कोरडे

शब्दांकन- अविनाश वाडेकर


दिवसाला बावीस किलोंमीटर्स

अशी आमच्या पायाची गती.

आम्ही सर्व चोंदा जण...

१९ मे १९८२

फिरोजपूर जनता एक्सप्रेस.

तब्बल तीस तास एकाच डब्यात.

२० मे च्या दुपारी दिल्ली प्लॅटफॉर्म.

फत्तेपूर सिक्री, आग्रा, किल्ला,

मोंगलांच्या मृत सावलीत फिरता फिरता ताजमहालच्या पायथ्याशीं चक्‍्क दुपारचा एक वाजला.

रसिकजन चांदण्यात ताजमहाल पहातात. आम्ही न्याहळला. ताजमहाल भर दुपारच्या चांदण्यात.

पोटात कावळे ओरडताना २२ तारखेची चंदीगडची वेटींग रुम अजून विसरायला होत नाही.

बियास नदीची थेट, रायसन पर्यंतची सोबत.  

आतापयंत लाटांचा नादच मी फक्त ऐकला होता.

पण आज प्रत्यक्ष खळाळते पाणी,

मुक्‍त अनावर लाटांच्या गारव्यात पावले मनसोक्त भिजवून काढली

आणि पुढे,

हिमालयीन शिखरे लागली,

ती पहाताच आम्ही चक्क आनंदाने ओरडायला लागलो.

पुढेपुढे तर कंटाळा येईल इतक्या बर्फाच्या गंरांड्यांत आम्ही सांपडलो.

रायसनच्या बेस कॅम्पात

तिन्ही बाजूंच्या डोंगराच्या गराड्यात.

फक्त बियास नदी आमंच्या सोबतीला

आमच्या खोल्या, मुलांचे छोटे छोटे तंबू,

आम्हा मुलींची लाकडी घरं

आमच्या घरांना हिमालयीन शिखरांची नावं, त्या घरात रात्र झाली नि आम्ही सर्वांनी शरीरे गरम स्वेटरात बंदिस्त केली

पण आमची उबदार मने?

ती तर, रात्रभर बाहेर भटकतच होती.

ती तर, रात्रभर बाहेर भटकतच होती.

* * * * *

किल्ले राजमाची


कर्जेतहून पांवसाळा वगळता कोंदिवडे पर्यंत एस. टी जाते. कर्जत पासूनच चालायला सुरूवात केली तर साधारण एक ते दिड तासात खांडप्याला पोहचता येते. तेथून उजव्यां बाजूच्या रस्त्याने पंधरावीस मिनिटात, ओहोळावरचा पूल ओलांडल्यावर कोंदिवडे लागते. हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. गावामागची चढण चढल्यावर उजव्या बाजूच्या रस्त्याने तासाभरात कोंडाणे लेणे लागते.

ठाकूरवाडीहून आल्यास तासाभरात उल्हास नदीत उतरता येते व तेथून अर्धातास चढल्यावर कोंडाणे लेणे लागते. तिची चढण पुढे उधेवाडी म्हणजे राजमाची गावापाशी दोन तासात घेऊन जाते. बरीच शेतजमीन आजुबाजूला असलेले पंचवीस ते तीस घरांचे हे गाव असून गावात एक मोठा तलाव व महादेवाचे मंदिर आहे.

श्रीवधेन व मनोरंजन हे दोन दुर्ग दोन तासात पाहून होतात. दोन्ही बालेकिल्ल्यांच्या मधे फारच थोडे अंतर असून दोन्हीच्या मधे बहिरोबाचे मंदिर आहे.

त्याच्या समोर दोनत्तीन दिपमाळा व एक तोफ आहे. तर मागच्या बाजूला (मनोरंजनच्या पोटात) पाण्याची तीन टाकी आहेत. गावातून मंदिराकडे येताना खडकात कोरलेल्या दोन प्रचंड आकाराच्या खोल्या आहेत.

श्रीवर्धन बालेकिल्याची चढण चांगलीच उभी आहे. आत प्रवेश केल्यावर डाव्या हाताला दोन पाण्याची टाकी आहेत. थोडे पुढे गेल्यावर खडकात कोरलेल्या खोल्या आहेत. डाव्या हाताला मागे आल्यावर एक बुरुज असून त्याच्या चिलखतात उतरता येते. बालेकिल्याच्या सर्वांत उंचावरच्या ठिकाणी ध्वजदंड लावलेला आहें, गडाचा आकार साधारण त्रिकोणी असून तिन्ही टोकांवर बुरुज आहेत. तिन्ही बाजूंना सरळ तुटलेले कडे असल्याने विशेष तटबंदी नाही. गडावर थोडे वाड्याचे अवशेष शिल्लक आहेत.

मनोरंजन हा अगदी लहान असून चढायला फारच सोपा आहे आणि म्हणूनच त्याला सर्व बाजूंनी भक्‍कम तट व बुरुज आहेत. गडावर दारूकोठार व किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष व पाण्याची टाकी वगळता बाकी काहीही नाही. पावसाळ्या व्यतिरिक्त कोणत्याही ऋतूमध्ये येणे योग्य, येथून माथेरानची रांग, माणिक गड, कर्नाळा येथ पर्यंतचे गड दृष्टीस पडतात, बोरघाटातील लोहमागं हे एक खास आकर्षणच आहे. रात्रीच्या वेळी दिव्यांच्या प्रकाशाने सजलेली अनेक बोगद्यांमधून धावणारी गाडी आपली नजर खिळवून ठेवते.

खाली राजमाची गावात जेवणाची, रहाण्याची सोय आगाऊ कळविल्यास होऊ शकते. राजमाचीहून पुढे वळवंड गाव दिड तासात लागते. तेथून शिरवटे धरण चारं तासानी लागते. पुढील चढण कार्लेच्या माथ्यावरची एका तासाची. तेथून अर्ध्या तासाने कार्ले लेणे लागते. कार्ले लेणे ते मळवली एक तासाचे अंतर आहे. तेथे पुणे-लोणावळा लोंकल अथवा पॅसेंजर गाडी फक्त थांबते.

 लोणावळयाहून जायचे जमल्यास दहा मैलाचा साधारण सखल मार्ग पार पाडावयास लागतो. हा मार्गे कमी त्रासदायक असून न चुकवता राजमाचीवर घेऊन जातो. लोणावळा स्टेशन मधून बाहेर पडल्यानंतर पुढे मुंबई-पुणे राजमार्ग लागतो. तेथे उजव्याबाजूला दोनचार मिनीटे चालल्यावर डावीकडून तुंगार्ली तलावाकडे रस्ता जातो. त्या रस्त्याने अडीच तासात वळवंड लागते. त्या आधी पांच मिनिटांच्या अंतरावर, (फाट्यावर) राजमाचीकडे' अशी पाटी लावलेली आहे.

या वाटेने दीड तासाची वाटचाल केल्यावर डावीकडे एक मोठा बुरुज दिसतो. त्यातून आत शिरल्यावर उजवीकडे एक मोठी दरी लागते. पलीकडच्या डोंगरावर वस्तीच्या खुणा दिसतात व त्यामागे ताठ उभा असा श्रीवर्धन किल्ल्याचा प्रचंड बुरूज व तटबंदी दिसते आणि पाऊण तासातच ढासळलेल्या प्रवेश द्वारातून गडात प्रवेश होतो. उजव्या बाजूच्या श्रीवर्धेनच्या उंच बुरजाला वळसा घालून व बाले किल्ला उजव्या हाताला ठेवून वाट माचीवरच्या गावात पोहोचते.

* * * * *

अभिनंदन

सचिवालय कर्मचाऱ्यांची रायगड प्रदक्षिणा

सह्याद्री संचारतर्फे सचिवालयातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबिय मंडळींनी २२ जानेवारी ८३ रोजी, वसई किल्ल्यातील भुयाराच्या शोधामुळे सर्वाना सुपरिचित असलेले श्री. अनंत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड प्रदक्षिणा पुर्ण केली.

एकंदर ६३ जणांच्या या पथकातील, संर्व लहान थोरांनी, ठेचाळत, कधी बसत, तर कधी घसरत, अन्नपाण्याविना तळमळत पण जिद्दीने हा उपक्रम पार पाडला व लगेच रात्री किल्ल्यावर प्रयाण केले, दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसिद्ध गिर्यारोहक श्री. हिरा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली  संपूर्ण गड उत्साहाने पाहिला व रात्री मुंबईस परतले. ह्याबद्दल सर्व मंडळींचे साहस तर्फे हार्दिक अभिनंदन!

साहस शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी

साहस शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी मॅफकोचे असिस्टंट टेकनिकल मॅनेजर श्री. वसंत लिमये हे २६ वर्षांचे युवक अडीच वर्षासाठी स्कॉटलंडची यात्रा करीत आहेत. तिथून परतल्यावर साहसी उपक्रमाचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणारी संस्था काढण्याचा त्यांचा मानस आहे. भारतातील अश्या प्रकारची ही पहिलीच संस्था असेल.

आंतरराष्ट्रीय विमानोडडाण शर्यत

गेल्या जून ८२ मध्ये कॅलिफोनियात जागतिक महिला वैमानिकांची आंतरराष्ट्रीय विमानोडडाण शर्यत झाली, त्यात श्रीमती चंदा सावंत व श्रीमती मरीन कार्पेन्टर ह्या दोघींनी पहिल्या दहांमध्ये नंबर पटकावला. एकूण ६८ महिलांनी यात सहभाग घेतला.

 वॉनन्झा व्ही ३५ बी ह्या विमानातून दोघोंनी उड्डाण केले. श्रीमती सावंत ह्या इंडियन वुमेन पायलटस असोसिएशनच्या अध्यक्षा आहेत.

* * * * *

 योगंद्र जहागिरदारांचे आठ पौंडी विमान

एक जबरदस्त साहस. या जहागिरदारांचा छंद किती मुलखा वेगळा. आणि सर्वंसामान्य माणसांना न परवडणारा. विमानांच्या प्रतिकृती तयार करीत रहाणे. आतापर्यंत त्यांनी निरनिराळ्या पंचवीस विमानांच्या विविध प्रतिकृती तयार केल्या आहेत.

व्यवसायाने, अहमदाबाद येथे इंजिनीअर. जहागिरदार यांनी डिसेंबर ८२ मध्ये आगळा विक्रमच केला. त्यांनी विमान तयार केले फक्त चार किलोग्रॅम वजनाचे विमानाची लांबी कितीं म्हणाल? फक्‍त दिड मीटर लांब, रुंदी फक्त अडीच मीटर व विमानाची उड्डाण पद्धती दूरनियंत्रण, रिमोट कंट्रोल पद्धतीने तयार केली आहे.

४ ते ६ डिसेंबर ८२ या कालावधित हैदराबाद ते पुणे या ६७५ कि. मी. मार्गावर अश्या प्रकारच्या पहिल्याच विमानाच्या उड्डाणाचा प्रयत्न करण्यात आला. या विमानाचे नियंत्रण रस्त्यावरुन धावणाऱ्या मेटाडोरमधून करण्यात आले. त्यावेळीं विमान ३० मीटर उंचीवरून उडत होते.

इंधन म्हणून मिथेनॉँल कॅस्टर ऑईल्चा वापर करण्यात आला. दीड तासाच्या प्रवासाला दीड लिटर इंधन असे प्रमाण पडले. इंधन संपताच खाली उतरून इंधन भरण्याची व्यवस्था करण्यात आलीं, प्रवासात एक इंजिन बिघडल्यास दुरुस्त करण्यात वेळ खर्च होऊ नये म्हणून दोन जादा इंजिने बाळगली होती. या प्रयोगासाठी सुमारे दहा हजार रुपयाची मदत अहमदनगरचे जिल्हाधिकारी अनिल कुमार लखीना यांनी क्रिडा निधीतुन केली.

* * * * *
 Y. H. A.

संकलन - विद्याधर बिर्जे

कोणत्याही राजकीय, धार्मिक व व्यापारी संघटनेपासून दूर असलेली युथ हॉस्टेल ही एक जागतिक संपटना आहे. ऐतिहासिक सांस्कृतिक व अन्य निसर्गरम्य ठिकाणो जाणार्‍या युवकांना वा इतरांना मुक्कामाची अल्पदरात सर्व सुखसोयीनी युक्‍त अशी निवासाची सोय करून देणे हा प्रमुख उद्देश या संघटनेचा आहे.

युवकांमध्ये प्रवासाचो आवड निर्माण व्हावी, त्यांना आपल्या देशातल्या विविध जाती, जमाती, प्रांत, परंपरा व त्यांची संस्कृती यांची ओळख व्हावी, बंधुभाव जागृत होऊन एकात्मतेची भावना वाढावी यासाठी ही संघटना प्रयत्न करीत असते. सर्व जाती धर्माच्या युवकांना एकत्र आणून त्यांच्यात सहकार्य, सहिष्णूता व बंधुभाव निर्माण करणे यासाठी तिचे कार्यकर्ते प्रयत्न करतात.

युथ होस्टेल्समध्ये नोकर नसतात. तुम्हाला स्वावलंबी बनून स्वत:चे काम स्वतः करावे लागते. काही पथ्य काटेकोरपणे पाळावी लांगतात. मद्यपानास जगातील सर्वे होस्टेल्समधून मज्जाव आहे. तसेच धूम्रपानास खोलीमध्ये परवानगी नसते. सर्व युथ होस्टेल्स रात्री दहा वाजता कटाक्षाने बंद होतात. त्यामुळे बाहेर फिरावयास जाणाऱ्यांना चांगल्या सवयी आपोआप लागतात. सर्वांना समान वागणूक देणाऱ्या या युथ हॉस्टेलची स्थापना व निर्मिती श्री. रिचर्ड शेरमन यांनी सर्वप्रथम जर्मनीत केली. ते स्वतः एक सामान्य शिक्षक होते. १८७४ – १९६१ पर्यंत ते आपल्या विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल शिकवत. निसर्ग इतिहास शिकवण्यासाठी वर्गाबाहेर प्रवासास ते मुलांना नेत. त्या चार पाच दिवसांत प्रवासात राहाण्याची सोय खर्चिक असे व मनासारखी होत नसे. अशाच एका प्रवात्तात त्यांना युथ हॉस्टेलची कल्पना सुचली व आज जगातील बहुतेक छोट्या मोठ्या राष्ट्रांनी ही कल्पना उचलून धरली आहे.

जगामध्ये गेली सत्तर वर्षापासून या संस्थेचे अविरत कार्य चालू असून भारतामध्ये या संघटनेची मुहूर्तमेढ रोवण्याचा मान म्हैसूर विद्यापीठाने मिळवला. अशा या आगळ्या वेगळ्या संघटनेची कार्यालये मुंबईत चर्नीरोड, ठाणे, डोंबिबली वर्गरे ठिकाणी आहेत.

प्रत्येक युनिट तर्फे पदभ्रमण, सायकल सहल, ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन त्यांचे महत्व जाणणे, खेळ, शैक्षणिक गोष्टींची चित्रपटाद्वारे माहिती देणे, रक्‍तदान शिबिरे आयोजित करणे व नामवंतांचे विचार ऐकणे इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात.

या संस्थेचे सभासद कोणासहो होता येते. शैक्षणिक संस्थाना चार लिडर्स कार्ड मिळतात. ते कोणताही विद्यार्थी मिळवू शकतो. एका लिडरला चार विद्यार्थ्यांसह युथ होस्टेल्सचा निवासासाठी वापर करता येतो. प्रवासाची झावड असणाऱ्याला अल्पखर्चात सर्व सुविधा युथ हॉस्टेल शिवाय अन्य कुठेहो मिळू शकत नाही.

प्रत्येक युथ हॉस्टेलचे युनिट महाराष्ट्र स्टेट कौन्सिल तर्फे इतर नॅशनल युथ फेडरेशनशी भारताच्या दिल्लो. मुख्य ऑफिस द्वारा संलग्न आहे.

* * * * *

शेवटी

अविनाश वाडेकर

या मासिकाच्या पानापानातून जितकं देता येईल तेवढं देण्याचा मनापासून प्रामाणिक प्रयत्न केला आहे?

आजच्या एकूण ज़ीवनात, संघर्षात, शहराशहरातून वाढत जाणार्‍या सिमेंट क्राँक्रीटच्या जंगलातूनही खर्‍या निसर्गाकडे धावणारी खूप तरूण मने वाढत आहेत. या मंडळींचं साहसाशी, मुलखावेगळ्या भटकंतीशी, डोंगर, पठार, पायी तुडवण्याशी अतूट नातं आहे. अशा विविध, मुलखा वेगळ्या छंदांना वाहून घेतलेल्या मंडळींच्या हालचालींवर लक्ष ठेवून या विषयाशी संबधित मासिक सुरू करावं असं ठरवलं.

प्रत्यक्ष कार्यास सुरूवात करताना, विविध व्यवसायातील हायकर्स, ट्रेकर्स, यांनीं खूप उत्साहाने या मासिकाचे स्वागत केलें. साहित्य मागतां, लिहिलेले अनुभव प्रसिद्धीसाठी दिले: या आलेल्या साहित्यातून त्याची वाडःमयीण दृष्ट्यां कडक तपासणी न करता, आपल्या अनुभवाशी प्रामाणिक असलेल्या या लिखाणाचे स्वागतच केले आहे.

शहरातील धावपळीच्या जीवनात निसर्गाची ओळख करून घेणे जिकीरीचे झाले आहे. सृष्टीचक्र पुरातन काळापासून चालूच आहे. आपले, डोंगर, पवंतांची उंच उंच शिखरे यांच्या माथ्यावर आपल्या पावलांचे ठसे उमटविणारी ही मंडळी, त्यांचे कोतुंक करणे, त्यांना व्यासपौठ मिळवून देणे, त्यांचें प्रश्न समजावून घेणं, ठिकठिकाणच्या साहसी संमूहांशी संवाद साधणे, इत्यादी अनेक संकल्प मनाशी आंहेत.

त्यादृष्टीने पहिले पाऊल म्हणजे हा अंक, या पानातुन काही उणीवा जरूर लपल्या आहेत, त्याविषयो आपल्या सूचना, नवे विचार जरूर हवेत. ते समजल्यावर आगामी अंकात त्या अमलात आणल्या जातील.

या अंकाची निर्मिती, तडीस नेण्यास सुनिल राजच्या परिश्रमास तोड नाही, त्याचा एकमेव ध्यास, अगदी तन, मन, धनासहीत अंक लवकरात लवकर काढण्यामागे होता. यात त्याची कामगिरी प्रशंसनीय ठरली आहे.

आता वाचलेत, त्याहीपेक्षा अधिक कांही पुढील अंकात जरूर देऊ. तो पर्यंत इथेच थांबतो.

 🙏  🙏  🙏 


14 comments:

  1. माझे कडे ही एक आवृत्ती होती 1984 की 1989 ची आठवत नाही आता shifting मधे कूठे गेली काही माहीत नाही 🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. रंजक तरीही उदबोधक माहिती , आवडली 💐💐💐

    ReplyDelete
  3. खूपच छान.. जुन्या आठवणी जाग्या झाल्या

    ReplyDelete
  4. स्तुत्य उपक्रम. जुन्या आठवणी जागवल्या गेल्या. ह्या मासिकाचा एक अंक माझ्याकडे आहे.
    विलास सुतावणे
    Vivisu Dehra
    9833410365
    www.vivisudehra.com

    ReplyDelete
  5. असे मासिक पुन्हा सुरू व्हायला हवे

    ReplyDelete
  6. पुर्व स्मृतींना उजाळा मिळाला. हे documentation मोठा ठेवा आहे.
    सुनीलचे हे वेडे पण शहाणे धाडस आहे.
    .
    शुभेच्छा अभिनंदनासह
    हिरेश चौधरी

    ReplyDelete
  7. सुनील खूपच छान उपक्रम आहे हा. नवीन पिढी मोबाईल मध्ये अडकली आहे. त्यांना निसर्गात आणि या साहसात घेऊन येण्यासाठी अशा उपक्रमाची गरजच आहे.

    ReplyDelete
  8. जयवंत दुखंडे

    ReplyDelete